105 year old voter Save village Shahuwadi
बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील सावे येथील तातोबा विठ्ठल नलवडे (वय १०५) व त्यांच्या पत्नी लक्ष्मी तातोबा नलवडे (वय ९५) यांनी मतदान केंदावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, तालुक्यात आतापर्यत ३० टक्के मतदान झाले. सर्वच मतदान केंद्रावर अत्यंत चुरशीने मतदान सुरु आहे.
जिल्हा परिषदेच्या ४ जागेसाठी १३ उमेदवार, तर पंचायत समितीच्या ८ जागेसाठी १९ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. तालुक्यात एकूण १ लाख ५९ हजार १२३ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून २०९ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे.
प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचारी कार्यरत राहतील. सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण १३८० जणांचा मोठा स्टाफ तैनात करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहितेच्या दृष्टीने चार स्थिर पथके आणि चार भरारी पथकांचा सक्त पहारा राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा शिंगण यांनी दिली.