शिये (ता. करवीर) येथील रामनगर परिसरात १० वर्षीय बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह सापडला.  Pudhari News Network
कोल्हापूर

कोल्हापूर हादरले : शिये येथे १० वर्षीय मुलीचा मृतदेह शेतात आढळला

Kolhapur News | अत्याचार करून खून केल्याचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

शिरोली एमआयडीसी ; पुढारी वृत्तसेवा : शिये (ता. करवीर) येथील रामनगर परिसरातून १० वर्षीय बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह सापडला असून या मुलीवर अत्याचार करून खुन केला असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. संशयास्पद वातावरण शिये परिसरात निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. (Kolhapur News)

शिरोली पोलिस बुधवारी रात्रभर या मुलीचा तपास केला होता. आज सकाळी काशिद यांच्या उसाच्या फडात या मुलीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात नेला आहे. (Kolhapur News)

शिये (ता. करवीर) येथील रामनगर परिसरात बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह सापडला.

शिये रामनगर येथील १० वर्षीय परप्रांतीय मुलगी बुधवार दुपारपासून घरातून गायब झाली असल्याने तिच्या नातेवाईकांनी शिरोली पोलिसात तक्रार दिली होती. शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी व त्यांचे अन्य सहकारी व स्थानिक नागरिकांनी शिये रामनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे व परिसरातील विहिरी , ओढे , उसाच्या शेतात तपास केला. पण कोणताच सुगावा हाती लागला नव्हता. मुंबई येथील घडलेल्या घटनेमुळे राज्यात तणावाचे वातावरण निर्माण असताना शिये येथील ही १० वर्षाची मुलीच्या मृत्युच्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह सर्व विभागीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT