कोल्हापूर : राजारामपुरीसह जवाहरनगर, राजेंद्रनगर परिसरात दहशत निर्माण करणार्या कुख्यात आर. सी. गँगच्या म्होरक्यासह 10 गुन्हेगारांना कोल्हापूर जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शुक्रवारी ही कारवाई केली.
गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या आणि शहरासह उपनगरामध्ये दहशतीच्या बळावर गुंडाराज निर्माण करणार्या दोन टोळ्यांतील 17 जणांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने गुन्हेगारी वतुर्ळात खळबळ उडाली आहे.
तडीपार झालेल्यांमध्ये गँगचा म्होरक्या रवी सुरेश शिंदे, प्रकाश कुबेर कांबळे, संदीप मोतीराम गायकवाड, योगेश मानसिंग पाटील, जावेद इब—ाहिम सय्यद, सागर सुरेश जाधव, प्रदीप रामचंद्र कदम, अक्षय ऊर्फ आकाश अशोक कदम, अजय ऊर्फ अजित सुनील माने, विकी अनिल माटुंगे यांचा समावेश आहे.