कोकण

साई रिसॉर्टप्रकरणी मंडल अधिकार्‍यास पोलिस कोठडी

दिनेश चोरगे

दापोली; पुढारी वृतसेवा :  वादग्रस्त ठरलेल्या साई रिसॉर्ट प्रकरणी मंडल अधिकारी सुधीर पार्दुले याला बुधवारी पोलिसांनी अटक केली होती. गुरुवारी न्यायालयात हजार केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पार्दुले यांनी 2022 रोजी रोजी साई रिसॉर्टप्रकरणी जागेची स्थळपाहणी करून पंचनाम्यावर पंचांची नावे न लिहिता फक्त सह्या घेतल्याचे पोलिस तपासात नमूद आहे.

साई रिसॉर्टप्रकरणी या आधी सदानंद कदम, तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे आणि आता सर्कल पार्दुले याला अटक केेली आहे.
दरम्यान, पार्दुले याला झालेली अटक ही कायदेशीर नसून याबाबत आम्ही जिल्हाधिकारी यांना भेटणार असल्याचे रत्नागिरी तलाठी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय गावकर आणि दापोली तालुका विनोद जाधव यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT