कोकण

रत्नागिरी : रामदास कदम मीडियासमोर बाम लावून रडतात : आमदार भास्कर जाधव यांची टीका

मोहन कारंडे

दापोली; प्रवीण शिंदे : आदित्य ठाकरे हे माझे मार्गदर्शक आहेत. त्यांच्यामुळे मी आमदार झालो, असे एकीकडे सांगून, दुसरीकडे त्यांना इशारा देतोय … यांनी लाज शरम सोडली आहे, अशी अप्रत्यक्ष टीका माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आमदार योगेश कदम यांच्यावर केली. तर रामदास कदम हे इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर डोळ्याला बाम लावून रडतात, अशी टीका यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर केली. दापोलीत अनंत गीते-भास्कर जाधव यांचे राजकीय फटकेबाजीला शिवसैनिकांनीही दाद दिली. दापोलीत दि 16 रोजी शिवसंवाद यात्रेनिमित्त अनंत गीते भास्कर जाधव हे दापोलीत आले होते. यावेळी त्यांनी हा समाचार घेतला.

निवडणुका कधीही होऊ शकतात जर हे सरकार पडलं तर भाजप सरकार बनविणार नाही आणि राष्ट्रपती राजवट लागू होईल. आणि विधान सभा बरखास्त होईल आणि विधानसभा बरखास्त झाली की पगार बंद होईल, असा उपरोक्त टोला यावेळी गीते यांनी विरोधक यांना हाणला. तुमच्या सातपिढ्या खाली उतरल्या तरी शिवसेना कोणीही संपवू शकणार नाही, असा गर्भित इशारा यावेळी अनंत गीते यांनी विरोधक यांना दिला आहे.यांना पैशाचा माज आला आहे यांच्या पैशाचा माज आपण उतरवू, यांच्या पैशाची माती केल्याशिवाय हा अनंत गीते स्वस्त बसणार नाही, असा इशारा देखील गीते यांनी दिली. एकीकडे शिवसेना म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे शिवसेनेचे धनुष्य गोठवायला सांगायचे ही जनता आणि हा शिवसैनिक तुम्हाला माफ करणार नाही, असेदेखील गीते यांनी सांगितले.

रामदास कदम ही शिवसेने बाबतची खोटी निष्ठा सांगायची बंद करा. अरे लढ्यायचे असेल तर मर्दासारखे लढा, असा इशारा शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांना दिला आहे. शिवसेनेला कुणाचं शेपूट धरून जाण्याची गरज नाही; पण रामदास कदम यांना भाजपचे शेपूट धरून जावं लागतं आहे. मी कुणावरही वैयक्तिक टीका करत नाही. मी आठरा वर्षांपूर्वी शिवसेनेच्या राजीनामा देऊन बाहेर पडलो होतो. जर हिंमत असेल तर आपल्या पोराला आमदारकीचा राजीनामा ध्यायला सांगा, असा चॅलेंजदेखील भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांना दिले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या वेळेस रामदास कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली, त्या वेळेस मीडियासमोर जाऊन रडून मी कसा शिवसेनेचा निष्ठावंत आहे, हे भासवत होते. पण ही नौटंकी महाराष्ट्राने पाहिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जास्त बोललो की विधान परिषदेत आमदारकी मिळेल, अशी वाट बघत रामदास कदम बसले आहेत, असे आ. जाधव म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT