रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जांभुळगड येथे तरुणाने अज्ञात कारणातून घराशेजारच्या गोठ्यात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार 25 जुलै रोजी सकाळी 6 वा. सुमारास उघडकीस आली. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रकाश दत्ताराम मांडवकर (40, रा. जांभुळगड, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्मत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत पोलिस पाटील जयंत गोपाळ फडके (48, रा. जांभुळगड, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.त्यानुसार, रविवार 24 जुलै रोजी रात्री 10 वा. प्रकाशने पत्नी प्राजक्ता मांडवरक हिला मी घराशेजारच्या गोठ्यात झोपायला जातो असे सांगितले होते. सोमवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास प्राजक्ता गोठ्यात गेली असता तिला पती प्रकाश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तिने आरडाओरडा करताच शेजारी राहणारे संजय चंदुरकर यांनी त्या ठिकाणी धाव घेउन या बाबत पोलिस पाटील जयंत फडके यांना माहिती दिली. पूर्णगड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.