कोकण

मान्सून सक्रिय! कोल्हापूर, कोकणात ‘रेड अ‍ॅलर्ट’

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर, कोकणात 'रेड अ‍ॅलर्ट' जारी करण्यात आला आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. पावसाने सर्वदूर तुफान हजेरी लावली आहे. कोकणात अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्रात मुसळधार, तर मराठवाड्यात दमदार आणि विदर्भात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे.

दरम्यान, कोल्हापूर, पुणे, कोकण आणि सातारा या भागात हवामान विभागाने 'रेड अ‍ॅलर्ट' जारी केला आहे. या भागात 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गेल्या 24 तासांमध्ये दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस पडला आहे. रायगड जिल्ह्यातील मुरूड येथे सर्वाधिक 348 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातही जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम सरी पडल्या.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वाढला पाऊस

अरबी समुद्रावरून वाढलेल्या वार्‍यांचे प्रवाह, बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण गुजरात लगतच्या समुद्रात तयार झालेले
कमी दाबाचे क्षेत्र तसेच या दोन्ही कमी दाब क्षेत्रांच्या दरम्यान कच्छ, उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागापर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा या स्थितीमुळे राज्यात पाऊस वाढला आहे.

कोकणात अतिवृष्टी

कोकणात गेल्या दोन दिवसांपासून अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे या भागातील अनेक शहरांतील पावसाने सरासरी ओलांडली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT