कोकण

खेडनजीक मिनी बसच्या अपघातात 20 जण जखमी

Arun Patil

खेड ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई- गोवा महामार्गा वरून पुणे येथून खेड तालुक्यातील नादिवली येथे अंत्यसंस्कारासाठी चाललेली मिनीबस शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास उधळे गावानजीक टायर फुटल्याने उलटली. या अपघातात बसमधून प्रवास करणारे 20 जण जखमी झाले त्यातील 4 जणांची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच 20 रुग्णांना 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. मेहर मापकर आणि सहाय्यक सतीश चव्हाण यांनी जखमींवर उपचार केले. जखमींमध्ये कला दगडू गोरे (37 नांदिवली ), लक्ष्मी संतोष गोरे (48, अस्तान), (आशा अशोक आखाडे 45 नांदिवली) शुभांगी सुभाष वरक (46, कावळे) कल्पना तुकाराम आखाडे (45, असतान ), अर्चना अनंत आखाडे (36, नांदिवली), अनंत रामचंद्र आखाडे (40, नांदिवली) सुनील विठ्ठल ठेबे (25 किंजळे), चंद्रकांत रामचंद्र आखाडे (33 नांदिवली) आनंद विठ्ठल ढेबे (25 किंजळे) सागर आनंदा खाडे (17 नांदिवली) अस्मिता अनंत आखाडे (18 नांदिवली) आरती चंद्रकांत आखाडे (9, नांदिवली) अशोक रामचंद्र आखाडे (52 नांदिवली) मंगेश संतोष गोरे (28 आस्तान) उषा चंद्रकांत आखाडे (27, नांदिवली) सुरेखा आखाडे (48 नांदिवली) यांचा समावेश आहे.

SCROLL FOR NEXT