वेंगुर्ले : गांजा बाळगल्याप्रकरणी सोमनाथ पुंडलिक मेणसे (वय 21, मूळ बेळगाव व सध्या हरमल गोवा येथे राहणारा) या तरुणाला वेंगुर्ले येथून मुद्देमालासह ताब्यात घेतले. वेंगुर्ला पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी व पथकाने ही कारवाई सोमवारी मध्यरात्री वेंगुर्ले पॉवर हाऊसजवळ मुख्य रस्त्यावर करण्यात आली. मेणसेकडून 26.92 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी सोमनाथ मेणसे याच्यावर वेंगुर्ले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस हवालदार पांडुरंग खडपकर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमनाथ मेणसे हा एका प्लास्टिकच्या पिशवीतून गांजा हा अमली पदार्थ घेऊन विक्रीसाठी जात होता. वेंगुर्ले पोलिसांचे पथक रात्रीची गस्त घालत असताना मध्यरात्री रस्त्याने एकटाच चालत जाणारा तरूण पाहून पथाकतील पोलिसांना शंका आली.
पोलिसानी त्याची घडती घेतली असता त्याच्याजवळ गांजा सापडून आला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. वेंगुर्ले पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी, उपनिरीक्षक श्री. गवारी, सहा.फौजदार श्री. कुबल, हवालदार श्री. राऊळ, जोसेफ डिसोझा, श्री. धुरी, कॉन्स्टेबल मनोज परुळेकर, पांडुरंग खडपकर, श्री. पालकर, श्री. सरमळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर करीत आहेत.