स्वप्नील उर्फ ज्ञानेश्वर धुरी pudhari photo
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : युवतीच्या अंगावर 'खाजकुवल्या' टाकणारा युवक पोलिसांच्या जाळ्यात

Girl harassment: एक दिवसाची पोलीस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

मालवण : युवतीच्या अंगावर खाजकुवल्या टाकून पळून गेल्याप्रकरणी युवतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विनायक स्वप्नील उर्फ ज्ञानेश्वर धुरी (वय 30) रा. वायरी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली आहे. धुरी याला पोलीसांनी अटक केली असून मालवण न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जी. एल. शिंदे, सुशांत पवार हे करीत आहेत. दुखापत करण्याच्या उद्देशाने घरात घुसण्याच्या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात सात वर्षपिक्षा जास्त शिक्षा असल्याने संशयीताला तातडीने अटक करण्यात आली होती. संशयीताकडून कसून तपास करण्यासाठी पोलीसांकडून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने पोलीसांची मागण मान्य करत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान घटनास्थळी संशयीताची दुचाकी आणि चप्पलही सापडून आल्याचे बोलले जात होते. यापुर्वीही घटना मालवणात घडल्या आहेत. काही जण युवतींच्या अंगावर खाज येणारी पावडर टाकून त्यांचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पोलिसांनी या घटनांची दखल घ्यावी अशी मागणी होत होती. मालवण तालुक्यात यापुर्वी युवतींना त्रास देण्याच्या काही घटना समोर आल्या होत्या. याप्रकरणी पोलीसातही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यामुळे या घटनांमध्ये युवतींचे घराच्या छप्परावरून व्हिडीओ काढण्याचीही तक्रार झाली होती. तर काही ठिकाणी अंगावर टाकल्यानंतर खाज येणारी पावडर टाकून त्रास देण्याचा प्रकार घडला होता. यामुळे या दोन्ही प्रकाराचीही चौकशी या निमित्ताने होण्याची शक्यता आहे.

मालवण पोलीसांनी याप्रकरणी गांभिर्याने तपास सुरू केलेला असून अनेक युवक रडारवर असल्याचे बोलले जात आहे. काहींचे मोबाईल जप्त करून त्यातून चौकशीही करण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

दरम्यान, पोलीसांकडून या प्रकरणी गुप्तता बाळगली असून सखोल तपास पूर्ण झाल्यानंतर माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT