Crime News Pudhari Photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : घरगुती वादातून महिलेला धमकी व शिवीगाळ

शिरगाव-शिंदेवाडी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

देवगड : घरगुती वादातून महिलेला धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी आरती दीपक शिंदे (५०, रा. पनवेल) व दीपक वसंत शिंदे (५२, रा. पनवेल) या पती-पत्नी विरूध्द देवगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ जुलै रोजी दुपारी ३ वा.च्या सुमारास शिरगाव-शिंदेवाडी येथे घडली.

घटनेतील पीडित महिलेचे माहेर शिरगाव-शिंदेवाडी येथे आहे. तिची आई मयत झाल्याने ती शिरगाव-शिंदेवाडी येथे राहण्यास गेली होती. आईचे दिवसकार्य सुरू असल्याने सर्व नातेवाईक तेथे घरी आले होते. यावेळी आरती शिंदे हिने पीडीतेला आईच्या मालकीचे घर मला हवे, तुम्ही येथून निघून जा, असे सांगून वाद घातला तसेच पीडितेच्या अंगावर धावत जात शिवीगाळ करून हात पाय तोडून टाकेन अशी धमकी दिली. तर दीपक शिंदे यांने पीडित महिला व तिच्या बहिणीच्या अंगावर धावत जाऊन तुम्हाला व कुटुंबियांना खपवून टाकेन, अशी धमकी दिली. तसेच पीडीतेच्या मनात लज्जा निर्माण होईल, अशा शब्दात अश्लील शिवीगाळ केली. याबाबत पीडीतेने देवगड पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली असून फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला पोलिस हवालदार सविता लाड करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT