Omkar Elephant 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Omkar Elephant : ‘ओंकार’ हत्तीचा इन्सुलीत धुमाकूळ

पडवीतील भातावर ताव मारत पंप विहिरीत ढकलला

पुढारी वृत्तसेवा

बांदा : सोमवारी ओंकार हत्तीने पुन्हा इन्सुली परिसरात हजेरी लावत धुमाकूळ घातला. भल्या सकाळी हा हत्ती येथील वालावालकर कुटुंबीयांच्या अंगणात दाखल झाला. यामुळे कुटुंबीयांची घाबरगुंडी उडाली. हत्तीने घराच्या पडवीत ठेवलेल्या भातावर यथेच्छ ताव मारला. तसेच घरालगतच्या विहिरीच्या काठावर ठेवलेला पाण्याचा पंप विहिरीत ढकलून दिला. यामुळे वालावलकर कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले.

ओंकार हत्ती इन्सुली गावात दाखल झाल्याची माहिती वन विभागाला नसल्याने वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सकाळच्या वेळी अचानक घराशेजारीच हत्ती दिसल्याने वालावालकर कुटुंबीय भयभीत झाले.

ओंकार हत्ती बांदा- इन्सुली परिसरात तसेच दोडामार्ग तालुक्यात धुमाकळ घालत आहे. विशेषतः भरवस्तीत घुसून बागायतींचे नुकसान करण्याबरोबरच गाड्यांची, अन्य वस्तूंची हा ओंकार मोडतोड करत आहे. ओंकार हत्तीचा वावर वाढत असताना वन विभाग त्याच्या पाळतीवर नसल्याची बाब गंभीर मानली जात आहे. वन विभागाने लक्ष ठेवून तातडीने गस्त वाढवावी, तसेच हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी इन्सुली ग्रामस्थांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT