साळशी गावात गव्यांकडून भातशेतीची नासधूस  
सिंधुदुर्ग

­­Sindhudurg News : साळशी गावात गव्यांकडून भातशेतीची नासधूस

नुकतीच लागवड केलेली भातरोपे केली फस्त

पुढारी वृत्तसेवा

शिरगाव : देवगड तालुक्यातील साळशी -सरमळेवाडी येथील त्रिपूर शेतात गव्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. शनिवारी मध्यरात्री गवाने शांताराम मिराशी यांच्या भातशेतीत घुसून नुकतीच लागवड केलेली भाताची रोपे फस्त केली. तसेच उर्वरित भातपिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.

शांताराम मिराशी यांनी यंदा कमी पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीतही मोठा खर्च करून अथक परिश्रमांच्या जोरावर भाताची लागवड केली होती. मात्र, गवा रेड्याच्या एका रात्रीतील उपद्रवामुळे त्यांच्या परिश्रमांची एका रात्रीत माती झाली असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आह मागील वर्षीही गवारेड्याने त्यांच्या भातशेतीची मोठी नासधूस केली होती. दरवर्षी त्रिपूर परिसरात गवा रेड्यांचा उपद्रव वाढत असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या सततच्या त्रासामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे सोडले आहे.

वन विभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन नुकसानीचा पंचनामा करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक भरपाई मिळावी तसेच गवा रेड्यांच्या वाढत्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT