आ. नितेश राणे बोलताना file photo
सिंधुदुर्ग

कणकवलीवासीयांना दिलेला शब्द पूर्ण केला : आ. नितेश राणे

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : खा. नारायण राणे यांनी कणकवली शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा शब्द नगरपंचायत निवडणुकीवेळी दिला होता. कणकवलीवासीयांना आम्ही जे-जे शब्द दिले, त्या सर्व गोष्टी व प्रकल्प शब्दांपलीकडे जाऊन कृतीतून आम्ही पूर्ण करून दाखवले आहेत, असे प्रतिपादन आ. नितेश राणे यांनी केले.

कणकवली शहराला भरघोस निधी 

यासाठी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व सर्व सहकाऱ्यांची मोठी मदत झाली. तसेच महायुतीचे सरकार आल्यानंतर कणकवली शहराला भरघोस निधीच्या माध्यमातून झुकते माप दिल्यामुळे हे प्रकल्प होत आहेत, असेही ते म्हणाले. कणकवली-जानवली जोडणारा गणपती साना पूल आणि त्याला लागूनच साकारलेल्या बारमाही धबधब्याचे लोकार्पण शुक्रवारी आ. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्ने, राष्ट्रवादी जिलाध्यक्ष अबिद नाईक, माजी नगरसेवक किशोर राणे, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, संजय कामतेकर, विराज भोसले, मेधा सावंत, अनिल पवार, महेश सावंत, बंडू गांगण, शिशिर परुळेकर, महेश सावंत, विशाल कामत, ठेकेदार अनिस नाईक आदींसह नागरिक उपस्थित होते.

आ. राणे म्हणाले, आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी कणकवलीचे नेतृत्व केले त्यांनी कणकवलीसाठी काय केले? आम्ही गेल्या पाच वर्षांत पोदार इंटरनॅशनल स्कूल, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, बारा महिने वाहणारा धबधबा, जाणवली गणपती साना पूल, रस्त्यांचे जाळे अशी अनेक कामे मार्गी लावली.

दिलेले शब्द पूर्ण केल्याचे समाधान

त्यामुळे कणकवली शहरात पाय ठेवल्यावर स्मार्ट कणकवली शहर पाहायला मिळते, याचे सर्व श्रेय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व सहकाऱ्यांचे आहे. प्रशासकीय अधिकायांचे व कर्मचाऱ्यांचेदेखील मोठे सहकार्य मिळाले, कणकवली शहरात पर्यटन बाढण्यासाठी य शहरातील लोकांना आकर्षण म्हणून बारमाही वाहणारा धबधबा साकारण्यात आला आहे. कणकवली वासीयांना दिलेले शब्द पूर्ण केल्याचे समाधान आहे.

अनिस नाईक यांचे आ. राणेंकडून कौतुक

आ. नितेश राणे म्हणाले, कणकवली व जानवली या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलामुळे दळणवळणाचे मोठे साधन निर्माण झाले आहे. या पुलाला विकाम सेतु म्हटले तर ते वावगे ठरणार नाही, ठेकेदार अनिस नाईक यांनी या पुलाचे दर्जेदार काम अवघ्या अडीच महिन्यांत पूर्ण केले, असे सांगत आ. राणे यांनी त्यांचा सत्कार केला,

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT