पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन देताना दादा बेळणेकर, योगेश बेळणेकर. pudhari photo
सिंधुदुर्ग

वाडोस गावात शेतकर्‍याच्या बांबू लागवड क्षेत्रावर वन विभागाचा दावा

दादा बेळणेकरांनी वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष : ना. राणेंकडून ‘जैसे थे’ चे आदेश

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वाडोस येथील शेतकरी संजय भिकाजी सावंत यांच्या पोल्ट्री फार्म व बांबू लागवड क्षेत्रात वन विभागाने अतिक्रमण केल्यामुळे संजय सावंत यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. याबाबत आपण पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले होते. यावर सदर प्रकरण जैसे थे ठेवण्याचे आदेश ना. नितेश राणे यांनी जिल्हा उपवनसंरक्षकांना दिल्याची माहिती भाजपा किसान मोर्चा माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य दादा बेळणेकर यांनी दिली आहे.

श्री.बेळणेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे, माणगाव खोर्‍यात संजय सावंत यांनी आपल्या मालकी जागेत 1995 व 2005 मध्ये एकुण प्रत्येकी 3000 कोंबडीचे दोन पोल्ट्री फार्म उभारले आहेत. तर उर्वरीत वडीलोपार्जित 30 गुंठे जागेत कित्येक वर्षांची बांबू लागवड आहे. मात्र वनविभागाने साद क्षेत्र वनजमीन असल्याचे सांगत ताब्यात घेतले आहे.

याबाबत श्री. सावंत यांनी जमिनीची फेर मोजणी करण्याची मागणी करूनही वन अधिकार्‍यांनी याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे या शेतकर्‍यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

एक महिन्यापूर्वी या ठिकाणी डिजिटल मोजणी झाली. अशा प्रकारची मोजणी योग्य नाही.पूर्वी जशी मोजणी केली जात होती तशीच झाली पाहिजे. काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेसाठी पाण्याच्या टाकीसाठी मी यातील जमीन दिली आहे. आता एवढढ्या वर्षांनी माझी 92 गुंठे जागा वनविभागाची असल्याचा साक्षात्कार वन अधिकार्‍यांना कसा झाला? वन विभागाने केलेली डिजीटल मोजणी मला मान्य नाही. मला माढ्या जमिनीची मोजणी करू दे, अशी विनंती करूनही वन अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. एक महिन्यापूर्वी निवेदन पाठवली आहे.
संजय सावंत, शेतकरी -वाडोस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT