वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संचलित वेंगुर्ले तालुका पत्रकार संघामार्फत शनिवारी (दि.२५) बॅ. नाथ समुदाय केंद्र वेंगुर्ले कॅम्प येथे सकाळी १० वा. पत्रकार गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात वेंगुर्ले पत्रकार समितीतर्फे देण्यात येणाऱ्या पत्रकार संजय मालवणकर आणि अरुण काणेकर स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार प्रदिप गंगाराम सावंत (दै.तरुण भारत संवाद), अजित सिताराम राऊळ (कोकणसंवाद), सुनील केशव मराठे( साप्ताहिक किरात ) आणि शंकर सिताराम घोगळे (दै.प्रहार -परुळे प्रतिनिधी) यांना हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी शालेय शिक्षणमंत्री आ. दिपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य व माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई , राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव एम. के. गावडे, राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख , राष्ट्रीय काँग्रेस कार्याध्यक्ष विलास गावडे , माजी नगराध्यक्ष संदेश निकम , माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल, उद्योजिका प्रज्ञा परब, वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी, वेंगुर्ले नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ, गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, पोलीस निरीक्षक संदीप भोसले, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी , बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगले, साहित्यिका वृंदा कांबळी तसेच अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.