वेंगुर्ले : बाजारपेठ येथे विक्रीसाठी उपलब्ध असलेला हापूस आंबा. pudhari photo
सिंधुदुर्ग

वेंगुर्ले बाजारपेठेत हापूस 400 रुपये डझन!

Hapus mango price: सर्वसामान्य खवय्यांमधून समाधान

पुढारी वृत्तसेवा

वेंगुर्ले ः वेंगुर्ले शहर बाजारपेठेत दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील हापूस आंबा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. यामुळे हापूसचे दरही बर्‍या पैकी घसरले असून सरासरी 400 रु. डझन या दाराने हापूस आंबा विक्री होत आहे. यामुळे हापूस आता सर्व सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात आल्याने आंबा खवय्यांमध्ये खुशीचे वातावरण आहे.

बुधवारी वेंगुर्ले बाजार पेठेतील मुख्य फळ विक्रेत्यांसह छोटे- मोठे विक्रेत्यांकडे हापूस विक्रीसाठी उपलब्ध झाला होता. आंब्याच्या प्रतवारीनुसार हा हापूस आंबा 400 रु., 500 रु., 600 रुपये प्रतिडझन या दराने विक्री करण्यात येत होता.

गेल्या आठवड्या पर्यंत सिंधुदुर्गच्या स्थानिक बाजारपेठांमध्ये हापूस आंब्याचा दर प्रति डझन 800 ते 1100 रू. असा होता. तर पंधरा दिवसांपूर्वी पर्यंत हाच दर 1500 ते 1800 रू. डझन असा होता. यामुळे सर्व सामान्य ग्राहकांना हापूस आंबट होता. मात्र आता दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील हापूस बाजारात आल्याने आंब्याच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. सहाजिकच हापूस आता सर्व सामान्यांच्या आवाक्यात आला आहे. अगदी छोट्या आकारातील हापूस 300 ते 350 रू. डझन दराने विक्री होत आहे. अन्य जातीचे आंबेही विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

देवगड हापूसचा दर टिकून

बाजारात हापूसचा दर घसरला असला तरी जगप्रसिद्ध व जीआय मानांकीत देवगड हापूसचा दर मात्र टिकून आहे. देवगड हापूस सध्या स्थानिक बाजार पेठांमधून 700 ते 800 रुपये प्रतिडझन या दराने विक्री होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT