वेंगुर्ला : वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांनी अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई केली. सोमवार दि. 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता चिपी विमानतळ शेजारी अनमोल अनिल सिरसाट (रा. परुळे) यांच्या मालकीचा डंपर ताब्यात घेऊन निवती पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
संबंधितावार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून दंडात्मक कारवाईबाबत पुढील कार्यवाही सुरु आहे. तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार श्री. गवस, मंडळ अधिकारी अजय कांबळी, तलाठी श्री. नायकोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. महसूलच्या या धडक कारवाईने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.