Nitesh Rane  pudhari photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg News| वैभववाडी-आचिर्णेत होणार वनस्पती उद्यान

एक कोटी निधी मंजूर; दुर्मीळ औषधी वनस्पतींच्या अभ्यासासाठी प्रकल्प

पुढारी वृत्तसेवा

वैभववाडी : निसर्गातील विविध औषधी वनस्पतींची ओळख करून देतानाच त्यांच्या संवर्धनाला चालना देणारे वनस्पती उद्यान आचिर्णे येथे साकारण्यात येणार आहे. या नावीन्यपूर्ण प्रकल्पासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुरत्न योजनेतून एक कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध केला आहे.

आचिर्णे येथे सुमारे अडीच एकर क्षेत्रात हा प्रकल्प होणार असून, या उद्यानात दुर्मीळ आणि उपयुक्त औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. त्यासोबतच पर्यटक, अभ्यासक आणि नागरिकांसाठी आवश्यक सोयी-सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहेत. मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या विविध वनस्पतींची ओळख, त्यांचे संवर्धन आणि त्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शिवाय वैभववाडी तालुक्याच्या पर्यटन, पर्यावरण आणि शैक्षणिक विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळणार आहे. या बोटानिकल गार्डनचे भूमिपूजन लवकरच खा. नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT