सिंधुदुर्ग

Vaibhav Naik: …अन्यथा आम्ही ‘भारत संकल्प यात्रे’च्या मागून फिरू : वैभव नाईक

अविनाश सुतार

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : विकसित भारत संकल्प यात्रेत जे अधिकारी नागरिकांच्या प्रश्नांना अचुक उत्तरे देतील, त्यांनीच या रथासोबत फिरावे. अन्यथा येत्या आठ दिवसांत ज्या – ज्या ठिकाणी हा रथ जाईल, त्या – त्या ठिकाणी आम्ही या रथाच्या मागे फिरू, असा सुचक इशारा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. Vaibhav Naik

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले आठवडाभर ज्या- ज्या ठिकाणी हा रथ जात आहे. त्या – त्या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी अधिकार्‍यांना प्रश्न विचारले. हा रथ कुडाळमध्ये आला तेव्हा कुडाळच्या लोकप्रतिनिधींनी इंदिरा आवास व इतर विविध योजनांबाबत शंका विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपच्या झुंडशाहीने आमच्या स्थानिक नगरसेवकांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी जी तक्रार दिली आहे. त्या तक्रारीमध्ये आमच्या लोकांची नावे आहेत. परंतु व्हिडिओमध्ये आडकाठी आणणारे जे लोक दिसत आहेत, त्यांची नावे नाहीत. खरे तर विरोधकांची लोक या कार्यक्रमात जाणीवपूर्वक आडकाठी आणत होती. काही लोक बाहेरची सुध्दा होती. ती झुंडशाही करत होती. तरीपण त्यांची या तक्रारीत नावे नाहीत. Vaibhav Naik

आम्ही पोलिस प्रशासनाला सुचना केली आहे की, निपक्ष:पातीपणे चौकशी करा. विरोधी गटावर सुध्दा गुन्हे दाखल होणे आवश्यक आहेत. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही. चार – चार तास भाजपचे कार्यकर्ते बसून पोलिसांवर दबाव आणत असतील, तर सीईओ तक्रार द्यायला तयार नव्हते, तरीही त्यांच्यावर दबाव आणून तक्रार दाखल करायला लावली असेल, तर या झुंडशाहीला लोकांचा विरोध आहे. पोलिसांना माझे आवाहन आहे की, आता यापुढे ज्या – ज्या ठिकाणी मोदी रथ जाईल त्या – त्या ठिकाणी संरक्षणासाठी पोलिसांची एक व्हॅन घेवून जा. कारण गावागावात याचा उद्रेक होणार आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी सुध्दा केवळ कार्यालयात बसून किंवा शनिवार, रविवार सुट्टी घेवून नुसते बसु नये. लोकांचे काय प्रश्न आहेत? लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. किसान सन्मान योजनेत ५० हजार नावे कमी झाली आहेत, याचे प्रश्न उपस्थित करणे अपेक्षित होते. इंदिरा आवास निधीतून लोकांना घरे उपलब्ध करून देणार आहेत, त्यांचे प्रश्न उपस्थित करणे गरजेचे होते. तर नियमित कर्ज वाटपचा प्रश्न जैसे थेच आहे, असेही नाईक म्हणाले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT