वेंगुर्ले, पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील केळुस ग्रामपंचायत अधिकारी विवेक रमेश वजराटकर यांना सन २०२३ -२०२४ चा राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच परुळेबाजार ग्रामपंचायत अधिकारी शरद श्रीरंग शिंदे यांना सन २०२२ - २०२३ चा शासन आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचे जिल्ह्यासह तालुकास्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे. (Sindhudurg News)
हे पुरस्कार आज (दि.१५) जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे जिल्हा परिषद स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी यांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. कोकण विभागातून व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद स्तरावर अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी यांना शासनाच्या स्तरावर यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार सन 2022 - 23 व 2023 -24 या वर्षाकरिता आदर्श ग्रामपंचायत अधिकारी यांची निवड शासनाकडून जाहीर कण्यात आली आहे.
दोघांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. दोन्ही ग्रामपंचायत अधिकारी यांचे गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी गुरुनाथ धुरी आदींनी अभिनंदन केले आहे.