आंबोलीत पर्यटकाचा बुडून मृत्यू; सहा दिवसांत तिसरी घटना 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : आंबोलीत पर्यटकाचा बुडून मृत्यू; सहा दिवसांत तिसरी घटना

पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

आंबोली : आंबोलीत आलेल्या एका अतित्साही पर्यटकाचा येथील सतिचीवाडीतील पाण्याने भरलेल्या चिरेखाणीत बुडून मृत्यू झाला असून, संजय लक्ष्मण गावकर (५० रा. इन्सुली, ता. सावंतवाडी) यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. ६ दिवसांत वेगवेगळ्या ३ घटनांमध्येे ३ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

सावंतवाडी - माजगाव उद्यमनगर येथील खासगी एका कंपनीत काम करणारे मिळून १३ जण सावंतवाडी - माजगाव आणि इन्सुली आदी परिसरातून आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी आले होते. एका चिरेखाणी जवळ सदर ग्रुपने पार्टी केली. काहीजण चिरेखाणीत अंघोळ करण्यासाठी गेले होते. संजय गावकर यांनी देखील पाण्यात उडी घेतली. मात्र, पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडत होते. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अपयश आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT