कुडाळ : तेलंगणा राज्यातील रजकंडा पोलिस ठाण्यात जानेवारी 2024 मध्ये ड्रग्ज प्रकरणी गुन्हा दाखल असलेला व फरार असलेला अर्जुन गोविंद पार्सेकर (58, मूळ रा. सांताक्रूज गोवा) याला कुडाळ तालुक्यातील झाराप साळगांव येथून तेलंगणा पोलिसांनी ताब्यात घेतले.
संशयीत आपल्या झाराप साळगांव येथील सासरवाडीला आला होता. त्याचे मोबाईल लोकेशन झाराप मिळाल्याने तेलंगणा पोलीसांनी येथे येत ताब्यात घेऊन रात्री तेलंगणाकडे रवाना झाले. जानेवारी 2024 मध्ये अर्जुन पार्सेकर यांच्यावर ड्रग्ज प्रकरणी तेलंगणात रजकंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळ पासून तो फरार होता. तेलंगणा पोलिस त्याचा शोध घेत होते मात्र तो सापडत नव्हता. गेल्या दोन तीन दिवसापासून त्यांचे मोबाईल लोकेशन कुडाळ तालुक्यातील झाराप साळगांव टॉवरला मिळू लागले.