मालवण : मालवण तालुक्यातील तारकर्ली -वरचीवाडी येथील मच्छीमार भालचंद्र ऊर्फ दाजीबा कुबल यांच्या मासेमारी व्यवसायातील छोटी नौका पात व जाळी आगीत जळाली. यात सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. अज्ञाताने घातपात करून आग लावली असावी अशीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच शिवसेना मच्छीमार सेल जिल्हा प्रमुख राजा गांवकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, मच्छीमार सेल तालुकाप्रमुख भाऊ मोरजे यानी तारकर्ली येथे जाऊन सदर घटनेची पाहणी केली. दाजीबा कुबल याना आश्वासीत केले. कुडाळ मालवणचे आमदार नीलेश राणे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख दत्ता सामंत सोबत असल्याचा विश्वास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दाजीबा कुबल यांना दिला.