मुंबई : ताज हॉटेल उद्योगाचे अधिकारी मंत्री नितेश राणे यांचे स्वागत करताना. pudhari photo
सिंधुदुर्ग

ताज हॉटेलने सिंधुदुर्गात गुंतवणूक करावी : मंत्री राणे

Taj Group: ताज ग्रुपच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : जगभरात नावलौकिक असलेल्या ताज हॉटेल उद्योगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकल्प उभारावा, यासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे प्रयत्नशील आहेत. पर्यटनदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा विकसित व्हावा, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ताज हॉटेलच्या व्यवस्थापनासोबत बैठक करून त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात हॉटेल प्रकल्प उभारण्याचे आवाहन मंत्री नीतेश राणे यांनी केले आहे.

ताजच्या माध्यमातून सिंधुदुर्गात गुंतवणूक केली जावी, यासाठी मंत्री नीतेश राणे प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी नुकतीच ताज हॉटेल्स अँड हॉस्पिटॅलिटीचे एमडी पुनीत चटवाल आणि कार्यकारी उपाध्यक्ष बीजल देसाई यांच्यासोबत मुंबईत मंत्रालयातील दालनात बैठक घेऊन चर्चा केली.

पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासात्मक उंचीवर नेण्यासाठी पर्यटन क्षेत्रात विश्वासार्हता असलेल्या ताज हॉटेल्स आणि हॉस्पिटॅलिटीने जिल्ह्याचा पार्टनर म्हणून पर्यटन क्षेत्रात काम करावे. आम्ही तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य आणि मदत करू, असे आश्वासन ना. राणे यांनी दिले. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे त्याला विकसित करण्याबाबत काय करावे लागेल या विषयी सविस्तर चर्चा झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT