रेडी : क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी रेडी कनयाळ येथील नवदुर्गा कुलदेवतेचे दर्शन घेतले, यावेळी उपस्थित अन्य  (Pudhari Photo)
सिंधुदुर्ग

Sunil Gavaskar visit Vengurla | वेंगुर्लाचे सुपुत्र क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी घेतले नवदुर्गा कुलदेवतेचे दर्शन

रेडी कनयाळ येथील अन्नछत्र सभागृहाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी सहकुटुंब उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

Navdurga Kuldevi Gavaskar darshan

अजय गडेकर

वेंगुर्ला : भारतीय क्रिकेट संघांचे माजी विक्रमादित्य फलंदाज व ज्येष्ठ समलोचक, वेंगुर्ला उभादांडा गावचे सुपुत्र सुनिल गावसकर यांनी सहकुटुंब वेंगुर्ला तालुक्यातील रेडी नवदुर्गा मंदिर येथील आपल्या कुलदेवतेचे दर्शन घेतले. यावेळी ते पूजा करून देवीच्या चरणी नतमस्तक झाले.

अन्नछत्र सभागृहाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी ते सहकुटुंब आले होते. यावेळी त्यांच्यासोबत क्रिकेटपटू गुंडाप्पा विवनाथ हे होते. येथून पुढे दरवर्षी येथे उपस्थित राहून आणखी चांगले कार्य करण्याचे त्यांनी आश्वासित केले.

यावेळी गावसकर यांचे नवदुर्गा देवस्थानचे व्यवस्थापक राजीव गावसकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी महाजन गावसकर मंडळी, ग्रामपुरोहित सिद्धेश जोशी, मारुती जोशी, रेडी ग्रामपंचायत सरपंच रामसिंग उर्फ भाई राणे, ठेकेदार अमेय भोसले आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर सुनिल गावसकर यांनी आपल्या मूळ घरी वेंगुर्ला उभादांडा येथे कुळकर देवस्थानला भेट देऊन दर्शन घेतले.

तसेच त्यांनी वेंगुर्ला तहसीलदार कार्यालय तसेच वेंगुर्ला कॅम्प येथील प्रसिद्ध स्टेडियमला भेट दिली. येथील नगरपरिषदेच्या सुंदर रचनेबद्दल समाधान व्यक्त केले. वेंगुर्ला तालुक्यात क्रिकेट या लोकप्रिय खेळाच्या प्रसिद्धी, प्रगती व उद्योन्मुख क्रिकेटपटू घडविण्यासाठी आपण निश्चित प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT