कुडाळ : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मिलिंद गुरव यांच्याकडे निवेदन देताना मनसेचे पदाधिकारी.  pudhari photo
सिंधुदुर्ग

अमली पदार्थाची वाहतूक रोखा अन्यथा आंदोलन!

illegal drug trade: मनसेचा राज्य उत्पादक विभागाला अल्टिमेटम

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : गोवा राज्यातून कुडाळ मार्गे होणारी अवैध दारू, गुटखा व अंमली पदार्थाची वाहतूक त्वरीत रोखा. येत्या दहा ते पंधरा दिवसात या अवैद्यरित्या वाहतुकीवर कडक कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उत्पादन शुल्क कार्यालया बाहेर घंटानाद तथा बोंब मारो आंदोलन करेल, असा इशारा लेखी निवेदनाद्वारे मनसेच्या शिष्टमंडळाने कुडाळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना दिला.

मनसे तालुका उपाध्यक्ष गजानन राऊळ यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ येथील कार्यालयात जात निरीक्षक मिलिंद गुरव यांना निवेदन दिले. कुडाळ तालुक्यातून अवैधरित्या होणारी दारू, गुटखा व अमली पदार्थांच्या वाहतुकीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. पालकमंत्र्यांनी आदेश देऊन सुद्धा कारवाई का होत नाही असे विचारल्यावर उत्पादन शुल्क निरीक्षक यांनी मनुष्यबळ कमी असल्याची हतबलता बोलून दाखवली. यावर मनसेतर्फे राज्य उत्पादन शुल्क विभागास रस्त्यावर उतरून सर्वतोपरी सहाय करण्याचे आश्वासन देत आपण कुडाळ पोलिस निरीक्षक यांची मदत घेण्याचे सुचविले, अशी माहिती मनसेकडून देण्यात आली. मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष यतीन माजगावकर, माजी उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, शाखाध्यक्ष नेरुर अनिकेत ठाकुर, अक्षय जोशी, सूरज नेरूरकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT