किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी होडी वाहतूक 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Fort| किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी होडी वाहतुकीस प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

मालवण : नव्या पर्यटन हंगामात येथील किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी किल्ले प्रवासी होडी वाहतूक सेवेस सोमवार पासून सुरुवात झाली आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी दिली.

जिल्ह्याच्या किनारपट्टी परिसरात २५ मे ला पर्यटन हंगामाची सांगता झाली होती. गेले तीन महिने बंद असलेले किनारपट्टी भागातील पर्यटन आता सुरू होत असून पर्यटन व्यवसायिकही सज्ज झाले आहेत.

१ सप्टेंबर पासून पर्यटन हंगामास सुरवात होते. मात्र समुद्रातील वाऱ्याचा वेग व पाऊस यामुळे यावेळी उशिराने हंगामाची सुरुवात झाली. चाकरमानी तसेच राज्याच्या विविध भागातून पर्यटकही दाखल होत आहे. याच पार्श्वभूमीवर पर्यटकांना किल्ले सिंधुदुर्गला भेट देता यावी यासाठी सोमवार पासून किल्ले प्रवासी होडी वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. मार्चमध्ये संपलेले परवाना नूतनीकरण करण्यासाठी बंदर कार्यालयाकडून लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये नौकांचा सर्वे अनिवार्य आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT