महिला व बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : महिला व बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

मळगांव : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून कामकाज केले. सर्वसमावेशक आकृतिबंध तत्काळ मंजूर करणे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला व बालविकास विभागाची पदे निर्माण करणे, जिल्हा परिविक्षा अधिकारी पद राजपत्रित अधिकारी गट ब म्हणून घोषित करणे आदी मागण्या या कर्मचाऱ्यांच्या आहेत. विविध योजनांसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या मागणीसाठी सोमवार पासून आंदोलन सुरू आहे.

आंदोलनाचे स्वरूप ठरविण्यात आले असून, त्वरित मागण्या मान्य न झाल्यास अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा पवित्रा घेतला आहे. याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी तृप्ती घोडपिसे यांना निवेदन सादर केले.महिला बाल विकास विभागात अपुऱ्या मनुष्यबळा अभावी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे शासनाने विविध योजनांसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करणे गरजेचे आहे. यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्य महिला व बालविकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेमार्फत आमच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहोत असे महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT