नोकरीच्या आमिषाने गंडा File Photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg Fraud Case| नोकरीच्या आमिषाने फसवणूकप्रकरणी संशयित महिलेस अटक

कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : केंद्र सरकारमध्ये नोकरी लावते, असे आमिष दाखवून सुमारे १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी असलेली विनिता विवेक मुंज (५०, कणकवली-पटकीदेवी) हिचा अटकपूर्व जामिन न्यायालयाने फेटाळल्यानंतर ती शुक्रवारी स्वत:हून कणकवली पोलिसांसमोर हजर झाली. तिला अटक करून न्यायालयात हजर केले असता १६ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तसेच मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवें ऑफ इंडिया येथे नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून पाचजणांकडून प्रत्येकी २४ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात दाखल आहे. सुनील दामोदर धुरे (रा. कलमठ-गावडेवाडी) यांच्या फिर्यादीनुसार विनिता विवेक मुंज, सुबत्ता माळी, (रा. कणकवली) आणि मनोजकुमार जैन (रा. वाशीम), भागवत यादव, उमेष घोष, जनकराम यादव व निरज श्रीवास्तव यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्हयातील आरोपी विनिता मुंज हिने अटकपूर्व जामीन मंजूर होण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता.

फिर्यादी घुरे यांची पत्नी आरोग्य खात्यात काम करत असल्याने, तिच्यासोबत काम करणारी विनिता मुंज हिने मुलांना केंद्र सरकारची नोकरी मिळण्याबाबत आपल्याकडे ओळखी आहेत, असे सांगून प्रत्येकी २४ लाख रुपये रोख घेतले होते. फिर्यादीची मुले सिद्धेश व माधुरी घुरे तसेच तन्बी म्हस्के व चैतन्य नाईक, निकीता वळवी यांनी प्रत्येकी २४ लाख प्रमाणे १ कोटी २० लाख एवढी रक्कम विनिता मुंजमार्फत सुबत्ता माळीकडे दिली होती. याप्रकरणी विनिता मुंज हिला पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात एकूण ७ आरोपी आहेत. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत आरोपींच्या मागावर पोलिस आहेत. अधिक तपास कणकवलीचे पोलिस उपनिरीक्षक सरदार पाटील करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT