वेंगुर्ले, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वेतोरे पालकरवाडी येथील रहिवासी महादेव सहदेव गोसावी (वय ६२) हे शुक्रवारी (दि.३) दुपारी ३.३० पासून बेपत्ता झाले आहेत. महादेव गोसावी हे शुक्रवारी दुपारी सरंबळ (कुडाळ) येथे नातेवाईकांकडे जाऊन येतो, असे सांगून घरातून निघून गेले ते अद्यापपर्यंत घरी न परतल्याने रविवारी त्यांचा मुलगा समीर महादेव गोसावी यांनी वेंगुर्ले पोलीस स्थानकात बेपत्ताची खबर दिली आहे.
महादेव गोसावी यांनी पांढऱ्या कलरचा टी-शर्ट, काळ्या कलरची फुल पॅन्ट परिधान केली आहे. कमरेला भगवी शाल बांधली असून दोन्ही कानात चांदीचे रिंग असा पेहराव केला आहे. याबाबत दाखल फिर्यादीनुसार वेंगुर्ले पोलीस स्थानकात बेपत्ता नोंद करण्यात आली आहे. वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस हवालदार योगेश सराफदार करीत आहेत.