गणरायाच्या उत्सवात माणुसकीचा ‘शिधा’ 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : गणरायाच्या उत्सवात माणुसकीचा ‘शिधा’

विशाल परब यांच्या पुढाकारातून वेंगुर्लेतील दिव्यांग बांधवांसाठी उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

वेंगुर्ला : गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचा सण. या आनंदापासून समाजातील कोणताही घटक वंचित राहू नये, या भावनेतून भाजप युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून दिव्यांग बांधवांसाठी शिधा वाटपाचा सामाजिक उपक्रम रविवारी वेंगुर्ला येथील साईदरबार हॉलमध्ये झाला.

गणेशोत्सवानिमित्त दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचा शिधा देत त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून, यंदाही दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे काम या माध्यमातून करण्यात आले. सण-उत्सवांचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, हीच सामाजिक बांधिलकीची खरी भावना आहे. गरजू घटकांच्या अडचणी समजून घेत त्यांना मदतीचा हात देण्यासोबतच त्यांना सन्मान आणि आपुलकीची जाणीव करून देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे गणेशोत्सवाच्या सामाजिक संदेशाला अधिक व्यापक स्वरूप मिळाले.

समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि गरजूंना मदतीचा हात देणे, हीच गणरायाच्या उत्सवाची खरी शिकवण असल्याची भावना यावेळी विशाल परब यांनी सांगितले. युवा नेते विशाल परब यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई यांच्या नियोजनाखाली झालेल्या उपक्रमास ज्येेष्ठ नेते राजू राऊळ, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजप दिव्यांग विकास आघाडी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे, पदाधिकारी साईप्रसाद नाईक, नगरसेवक सचिन शेटये, किरण कुबल, दिलीप परब यांच्यासहित भाजप दिव्यांग आघाडीचे कोषाध्यक्ष सुनील तांबे, कुडाळ तालुका प्रभारी अश्विनी पालव, महिला उपाध्यक्ष गीता परब, वेंगुर्ला तालुका प्रभारी सुनील घाग, सहसंयोजक सुनील कांबळी, क्रीडा प्रभारी जयश्री मेजारे, मालवण तालुका उपाध्यक्ष रंजना इंदूळकर, शासकीय प्रभारी विजय कदम, कुडाळ विभाग प्रमुख अनिता धुरी आदी उपस्थित होते. या उपक्रमाला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद यामुळे या उपक्रमाला सामाजिक बांधिलकीची सुंदर किनार लाभली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT