वेंगुर्लेत आंबा बागायतदारांनी रोखली कॅनिंग आंब्याची वाहतूक 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : वेंगुर्लेत आंबा बागायतदारांनी रोखली कॅनिंग आंब्याची वाहतूक

प्रती किलो दर वाढवून मिळण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मळगाव : वेंगुर्ले तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांना कॅनिंग आंब्याला कमी दर मिळत असल्यामुळे कॅनिंग आंबा वाहतूक करणाऱ्या वाहनांना रोखून धरली. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कंपनीने कॅनिंग आंब्याला योग्य तो दर देण्याची मागणी केली.

प्रतिकूल हवामानामुळे आंब्याचे उत्पादन एकदम घटले आहे. अशा परिस्थितीत सुरुवातीला आंबा कॅनिंगचा दर फक्त ५४ रुपये किलो जाहीर झाला. आंबा बागायतदारांचं म्हणणं आहे की उत्पादन खर्च पाहता पेटीला किमान ३००० रु. आणि किलोला किमान ४० रु. दर मिळायलाच हवा, अशी बागायदारांची मागणी आहे.

सध्या वेंगुर्ला तालुक्यात आंबा कॅनिंगला २८ रुपये किलो दर दिला जातो. एवढा कमी दर देवून जाणून बुजून शेतकऱ्यांची लूट चालू आहें. या वर्षी आंबा कमी असूनही बागायतदारांची लूट चालू आहे. शेतकरी हतबल झाला आहे. आंबा कॅनींगचा दर योग्य न दिल्यास आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याचीही दखल आंबा खरेदी करणाऱ्या कंपनीने घेतली नाही. त्यामुळे मंगळवारी रात्री कॅनिंगचा आंबा वाहतूक करणाऱ्या गाड्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे यांच्यासह शेतकऱ्यांनी अडवून आक्रमक भूमिका घेतली. कॅनिंग आंबा घेणाऱ्या कंपन्याने दर वाढवून द्यावा अशी मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT