वसोली-विरवाडी येथील पुलावरून मोटरसायकल वाहून गेली आहे.  
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : वसोली-विरवाडी येथील पुलावरून गेली मोटरसायकल वाहून

पुढारी वृत्तसेवा

माणगांव : कुडाळ तालुक्यातील वसुली- वीरवाडी येथील पुलावरून एक मोटरसायकल वाहून गेल्याची घटना बुधवारी (दि.२४) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. मात्र यातील मोटरसायकल स्वाराचा कोणताच पत्ता लागला नसून त्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. या पुलावरून गाडी वाहून गेल्याची ही पाचवी घटना आहे.       

वसोली वीरवाडी येथील पूल अतिशय कमी उंचीला आहे. या भागात बुधवारी मुसळधार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वसुली वीरवाडी येथील पुलावरील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. दरम्यान बुधवारी सायंकाळी एक मोटर सायकल या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन पुलाखाली पडलेली दिसत आहे. पाण्याचा अचानक प्रवाह वाढल्याने कदाचित ही मोटर सायकल वाहून गेल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी पाण्याची पातळी बऱ्याच प्रमाणात वाढली असून वाहून गेलेल्या मोटरसायकलचा फक्त आरसा नजरेस पडल्याने ही घटना समोर आली. मात्र मोटरसायकलस्वाराचा कोणताच पत्ता लागलेला नाही. संबंधित मोटर सायकलस्वार पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला की, सुखरूप आहे याची कोणतीही माहिती समोर आली नाही.

SCROLL FOR NEXT