कणकवली: पुढारी वृत्तसेवा सिंधुदुर्गात गुरुवारपासून सातत्याने अवकाळी पाऊस पडत आहे. पावसासोबतच वादळी वारे असल्याने झाडांचेही नुकसान होत आहे. सततच्या पावसाने काही प्रमाणात असलेल्या आंबा पिकाचेही नुकसान होत आहे. त्यातच लग्नसराई व विविध कार्यक्रम सुरू असल्याने उत्साहावर विरजण पडत आहे.
सिंधुदुर्ग गुरुवारी दुपारी विशेषतः सह्याद्री पट्ट्यात पावसाची अवकाळी पाऊस झाला. सुमारे तासभर पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.त्यानंतर शुक्रवारी सायंकाळीही ठीक ठिकाणी हलक्या सरी झाल्या. काही भागात वादळीवाऱ्यांमुळे झाडे उन्मळून पडल्याने विद्युत वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले. झाडे पडून रस्ता वाहतूक विस्कळीत झाली होती.
त्यानंतर शनिवारी सायंकाळी चार वाजतच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. त्याच बरोबर वादळी वारे ही झाले. सतत तीन दिवस अवकाळी पाऊस होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आंबा पिकावरील त्याचा परिणाम होणार आहे. तर सध्या जिल्ह्यात लग्नसराई सुरू असून त्या निमित्ताने होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये अचानक येणाऱ्या अवकाळी पावसाची मोठी अडचण होत