अनधिकृत मासेमारी : कर्नाटकची नौका जप्त 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : अनधिकृत मासेमारी : कर्नाटकची नौका जप्त

मत्स्यव्यवसाय विभागाची देवगड समुद्रात कारवाई

पुढारी वृत्तसेवा

देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अवैध मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्यातील ‘श्री माता’ नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने रविवारी पहाटे कारवाई करत ती जप्त केली. रविवारी पहाटे ४.३० वा. देवगड समुद्रात सुमारे १६ ते १७ वाव पाण्यात अंमलबजावणी अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पथक गस्त घालत असताना ही नौका अनधिकृतपणे गिलनेट मासेमारी करताना आढळली. या नौकेची मालकी श्रीमती हर्षिनी शशिधर बी. कुंडेर, (रा. मल्लपी, उडुपी) याची आहे.

या नौकेवर तांडेलसह एकूण १० खलाशी होते. नौका ताब्यात घेतल्यानंतर ती देवगड बंदरात आणण्यात आली. नौकेवर सापडलेल्या मासळीचा लिलाव प्रक्रिया सुरू असून, याबाबतचा संपूर्ण अहवाल सहा.आयुक्त मत्स्यव्यवसाय, यांच्या न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. सुनावणीनंतर नौकेच्या मालकांवर कायदेशीर कारवाई होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही यशस्वी कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली किरण वाघमारे तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक यांच्या सहकार्याने पार पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT