इंधन दरवाढीविरोधात उबाठा शिवसेनेचे देवगडमध्ये आंदोलन File Photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : इंधन दरवाढीविरोधात उबाठा शिवसेनेचे देवगडमध्ये आंदोलन

जाणीवपूर्वक इंधन टंचाई; युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

देवगड : ठाकरे शिवसेनेच्या वतीने देवगडमध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात जोरदार आंदोलन छेडण्यात आले. यावेळी ‘कहा गये अच्छे दिन’, 'इंधन दरवाढ करणाऱ्या सरकारचा निषेध असो' अशा घोषणा देण्यात आल्या. केंद्र व राज्य सरकारवर घणाघात करत केंद्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच पेट्रोल, डिझेलची टंचाई दाखवून दरवाढ करण्यात आली, असा आरोप युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला.

मंगळवारी सकाळी देवगड एसटी स्टँडसमोर ठाकरे शिवसेनेच्या वतीने युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली केंद्रशासनाविरोधात घोषणाबाजी, निदर्शने करीत इंधन दरवाढीविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. 'फेकू सरकार हाय हाय', 'इंधन दरवाढ करणाऱ्या सरकारचा निषेध असो' अशा घोषणा देण्यात आल्या. पेट्रोल, डिझेल दरवाढ रद्द करा, सर्वसामान्यांना दिलासा द्या, अशी मागणीही करण्यात आली.

सुशांत नाईक यांनी केंद्र व राज्यशासनावर जोरदार टीका केली. पेट्रोल, डिझेलचे दर तब्बल चार रुपयांनी वाढले असून आणखी २० ते ३० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईचा मोठा भडका उडणार आहे. जनतेला 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारचे हेच का अच्छे दिन, असा सवाल नाईक यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT