वेंगुर्ले : वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथे शेतमांगरात ‘नानाटी जाती’च्या सापाची आठ पिल्ले आढळून आली. शेतकरी सद्गुरू सावंत यांनी याबाबत सर्पमित्र महेश राऊळ यांना माहिती दिली. माहिती मिळताच महेश राऊळ यांनी आठही पिल्लांना कोणतीही इजा न होता सुखरूप पकडले.
सद्गुरू सावंत हे शेतमांगरात काम करत असताना त्यांना एका कोपऱ्यात काहीतरी वळवळताना दिसले. जवळ जाऊन पाहिले असता सापाची छोटी पिल्ले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी प्रसंगावधान राखत सापाच्या पिल्लांना हात न लावता थेट सर्पमित्र महेश राऊळ यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच महेश राऊळ यांनी घटनास्थळी जात परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांना नानाटी सापाची एकूण आठ पिल्ले आढळली. त्यांनी काळजीपूर्वक आणि कौशल्याने या सर्व पिल्लांना कोणतीही इजा न होता पकडले. पिल्ले आकाराने लहान असल्याने आणखी काही पिल्ले परिसरातून बाहेर गेली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.