सिंधुदुर्ग : आडाळी-कोसमवाडी घाटीत टेम्पोला अपघात pudhari photo
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : आडाळी-कोसमवाडी घाटीत टेम्पोला अपघात

Tempo crash: सुदैवाने टेम्पो चालक व सहकारी सुखरूप बचावले

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग ः आडाळी-कोसमवाडी घाटीत डांबर वाहतूक करणार्‍या टेम्पोला मंगळवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात टेम्पो रस्त्यावर पलटी होऊन पुन्हा उभा राहिला. सुदैवाने टेम्पो चालक व सहकारी सुखरूप बचावले. मात्र टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कळणे खाण प्रकल्प सुरू असल्याने दोडार्माग-बांदा मार्गावर माती वाहतूक करणार्‍या वाहनांची वर्दळ आहे. या वाहनांतील माती मार्गावर पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. मंगळवारी सकाळी बांदा येथून दोडामार्गकडे डांबर वाहतूक करणारा टेम्पो येत होता. आडाळी घाटीतील कोसमवाडी येथे टेम्पो आला असता रस्त्यावर पडलेल्या मातीमुळे टेम्पो स्लीप होऊन अनियंत्रीत झाला व रस्त्यावरच पलटी झाला. रस्त्यावर दोनवेळा पलटी घेत तो पुन्हा उभार झाला. यावेळी रस्त्यालगतच्या मोठ्या झाडाला टेम्पो अडकल्याने अनर्थ टळला. टेम्पोतील चालक व त्याच्या सहकार्‍याने जीवाच्या आकांताने आरडाओरडा केला. स्थानिक ग्रामस्थ व मार्गस्थ होणार्‍या वाहनचालकांनी या दोघांनाही सुखरूप बाहेर काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT