Leopard Sighting Sindhudurg (Pudhari Photo)
सिंधुदुर्ग

Sindhudurg Leopard | तळकट गावात बिबट्याचा थेट लोकवस्तीमध्ये प्रवेश, नागरिकांमध्ये भीतीचे सावट

लोकवस्तीमध्ये प्रवेश करत दाजी नांगरे यांच्या घराच्या अंगणात दाखल झाला

पुढारी वृत्तसेवा

Leopard Sighting Sindhudurg

दोडामार्ग : तळकट गावात मंगळवारी रात्री सुमारे ११:२० वाजण्याच्या सुमारास बिबट्याने थेट लोकवस्तीमध्ये प्रवेश करत दाजी नांगरे यांच्या घराच्या अंगणात दाखल झाला. या घटनेचा थरारक प्रसंग घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे.

या अनपेक्षित घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे सावट पसरले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्हीत बिबट्या काही काळ अंगणात उभा असल्याचे दिसून आले आणि त्यानंतर तो परिसरातून निघून गेला. मात्र, लोकवस्तीमध्ये वन्य प्राण्याचा हा मुक्त संचार ग्रामस्थांसाठी भयावह असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून गावाच्या परिसरात रात्रीच्या वेळी जनावरांचे ओरडणे व पावलांचे आवाज ऐकू येत होते. मात्र, मंगळवारी रात्रीचा हा प्रसंग प्रत्यक्ष कॅमेऱ्यात कैद झाल्याने भीती अधिक वाढली आहे. दररोज सकाळी मुले शाळेसाठी बाहेर पडतात. तर येथे फळ-बागायती मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांना पहाटेपासून शेती कामासाठी बाहेर जावे लागते. अशा परिस्थितीत बिबट्याचा वावर सुरू राहिला, तर कोणताही अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच रात्रीच्या वेळी बाहेर न जाणे, घरांच्या अंगणात प्रकाश ठेवणे आणि पाळीव जनावरे सुरक्षित स्थळी बांधून ठेवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT