सावंतवाडी ःआरोंदा येथील रस्त्यावर पट्टेरी वाघ दिसून आला असून गोवा येथे जात असलेल्या चारचाकी गाडीसमोर रात्रीच्या सुमारास या वाघाने दर्शन दिल्याची चर्चा आहे. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात हा वाघ रस्त्यावर बसलेला दिसून येत आहे.
आरोंदा येथील उमळ भागातील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत वन विभागाकडे चौकशी केली असता अद्याप कोणतीही ठोस माहिती नसल्याचे वन अधिकार्यांनी सांगितले. याबाबत चौकशी करून माहिती देऊ, असे ते म्हणाले.
दरम्यान, हा व्हिडीओ चंद्रपूर येथील असल्याचेही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे हा पट्टेरी वाघ नेमका कुठला, याबाबत अधिकृत माहिती वन खातेच देऊ शकेल.
सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पट्टेरी वाघ असल्याचे निदर्शनास आल्याने हा वाघ आरोंदा येथे दिसल्याची जोरदार चर्चा सर्वत्र आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.