श्रावण येथे चिरे वाहतूक करणारा डंपर उलटला 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Accident : श्रावण येथे चिरे वाहतूक करणारा डंपर उलटला

चालकासह पाचजण किरकोळ जखमी

पुढारी वृत्तसेवा

श्रावण : आचरा -कणकवली मार्गावर श्रावण-नदीवाडी येथे चिरे वाहतूक करणारा डंपर उलटला. या अपघातात डंपरमधील चिरे रस्त्यावर पडल्याने रस्त्यावरील वाहतूक दोन तास ठप्प होती. या अपघातात चालकासह पाचजण किरकोळ जखमी झाले.

बुधवळे ते ओरोस असे चिरे घेवून डंपर चालक ईजार अंन्सारी (20, रा.झारखंड) जात होता. डंपर श्रावण- रामगड सिमेवर श्रावण- नदीवाडी येथे आला असता ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्याने डंपर उलटला. सुदैवाने जिवित हानी झाली नाही. गाडीत चालकासह 4 कामगार होते. हे सर्व पाचहीजण किरकोळ जखमी झाले. अपघातात डंपरचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने त्यावेळी दोन्ही बाजुने दुसरे वाहन न आल्याने अनर्थ टळला. डंपरमधील चिरे रस्त्यावर पसरल्याने सुमारे दोन तास या मार्गावरील वाहतूक बंद होती. स्थानिकांच्या सहायाने चिरे बाजूला करून मार्ग सुरळीत करण्यात आला.

चिरे व वाळू वाहतूक करणारे डंपर चालक नेहमीच दोन ट्रिप अधिक होतील या आशेपोटी भरधाव जातात. यामुळे असे अपघात घडतात. अशा भरधाव डंपरवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक जनतेकडून वारंवार केली जाते. परंतु लोकप्रतिनिधी व प्रशासन मात्र डोळेझाक करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT