मित्राच्या त्रासाला कंटाळून निशाने संपविले जीवन  
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : मित्राच्या त्रासाला कंटाळून निशाने संपविले जीवन

पोलिसांच्या प्राथमिक तपासात माहिती; मृत रोहन गोसावीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : मोती तलावात उडी घेत आत्महत्या केलेली शाळकरी मुलगी निशा गोसावी हिने मित्र रोहन याच्या त्रासाला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे. दरम्यान नीशाला वाचवण्यासाठी तलावात उडी घेतलेला युवक रोहन गोसावी हा आपण नवीन जॉब करीता बाहेर जात आहे असे सांगून घरातून निघाला होता, अशी माहिती युवकाच्या वडिलांनी दिली. या दोन्ही आत्महत्येचा तपास सावंतवाडी पोलीस करत असून रविवारी मृत रोहन गोसावी याचा मृतदेह त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आला.

सावंतवाडी मोती तलावात शाळकरी मुलगी नीशा गोसावी हिने आपला मित्र रोहन गोसावी याच्याशी झालेल्या वादावादीतून शनिवारी उडी घेत जीवन संपविले होते. तिला वाचविण्यासाठी तलावात उडी मारलेला तिचा मित्र रोहन गोसावी याचा सुद्धा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या दोन्ही आत्महत्यांचा तपास सावंतवाडी पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शाखाली सुरू आहे. या घटनेवेळी तिथे उपस्थित असलेली नीशाची चुलत बहीणीचा जबाब पोलिसांना नोंदवून घेतला आहे. लिशा गोसावी आणि रोहन गोसावी यांचे तीन वर्षांपासून मैत्रीचे संबंध होते. निशा हिची यंदा दहावी असल्यामुळे पालकांनी तिला अभ्यासाकडे लक्ष देण्यास सांगितले होते. त्यात रोहन हा तिला वारंवार फोन, मेसेज करून त्रास देत असल्याने तिने त्याला सातत्याने त्रास देऊ नकोस, असे सांगितले होते.तसेच नीशाने त्याला मोबाईलवर ब्लॉक केले.

यानंतर रोहन गोसावी हा शनिवारी ठाणे- नालासोपारा येथून सावंतवाडीत आला. चिटणीस नाका येथे या दोघांची भेट झाली. या भेटीमध्ये दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यापुढे मला फोन, मेसेज करू नकोस असे नीशा हिने रोहनला सांगितले होते. यावरून दोघांमध्ये वाद टोकाला पोहोचला. नीशा हिने रोहनला यापुढे मला संपर्क करू नकोस अन्यथा तलावात उडी घेऊन, असा इशारा दिला. यानंतर काही वेळाने रोहन तेथून निघाला असता तिने मोती तलावात उडी घेतली. तिला वाचवण्यासाठी रोहन यानेही तलावात उडी मारली. मात्र त्याला पोहता येत नसल्याने त्याचही बुडून मृत्यू झाला.

पोलिसांनी दोघांचे मोबाईल ताब्यात घेतले असून रोहन गोसावी याचा मृतदेह वडील विजय गोसावी यांच्या ताब्यात रविवारी दिला. घडलेल्या घटनेमुळे दोन्ही कुटुंबीय धक्यात आहेत. तरुण पिढीने भरकटून कोणतेही निर्णय न घेता याबाबत वडील कुटुंबीय व पोलिसांशी संपर्क साधावा असे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी केले आहे. अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर व पोलीस मंगेश शिंगाडे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT