सात दिवसांनी जिल्ह्यात ९ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : सात दिवसांनी जिल्ह्यात ९ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत भावपूर्ण निरोप

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : जिल्ह्यात सात दिवसांच्या गणेशोत्सवाची मोठ्या थाटामाटात फटाक्यांच्या आतिषबाजी, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात ९ हजार ३२४ खासगी, तर १ सार्वजनिक गणेशमूर्तीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.

कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर शुक्रवारी गौरी-गणपतीचे, तर रविवारी सात दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. रविवारी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात ठीकठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणेश मूर्तीचे विसर्जन सुरू होते.

सात दिवसांनी पोलिस स्थानक निहाय विसर्जन झालेल्या गणेशमूर्ती

बांदा-६२०, दोडामार्ग-१,०९०, सावंतवाडी-२४८, वेंगुर्ले-१,२९१, निवती- १,२१०, कुडाळ-२,८६०, सिंधुदुर्गनगरी-५७६, कणकवली-६९५, विजयदुर्ग-२४३, देवगड-२७१, आचरा-११०, मालवण-११० असे मिळून ९ हजार ३२४ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. तसेच कणकवली येथील एक सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT