मडुरा : रोणापाल-तळेवाडी येथील भरवस्तीत सोमवारी दुपारी 4 वा.च्या सुमारास बिबट्याचे अचानक दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तानाजी नवशा धर्णे यांच्या घराजवळ हा बिबट्या दिसून आला. सावजाच्या शोधात तो थेट वस्तीपर्यंत पोहोचल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्यात भीतीचे वातावरण असून, नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत.
या घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन केवळ पाहणी केली व सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आश्वासन देऊन औपचारिकता पार पाडली. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.