Sawantwadi Panchayat Samiti 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : सावंतवाडी पं. स.चा कारभार रामभरोसे!

प्रभारी बीडीओ व विस्तार अधिकारी अभियान तपासणी दाैऱ्यावर

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : सावंतवाडी पंचायत समितीला सध्या कोणीही वाली नसून पंचायत समितीचा कारभार रामभरोसे सुरू आहे. प्रभारी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान तपासणी करीता सातारा येथे गेले असून आठ दिवस पंचायत समितीला वाली कोणी नाही. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गाड्यांची हवा सोडवण्यापेक्षा प्रशासनातील ढिसाळ कारभारावर लक्ष घालावा, असा टोला मनसेचे पदाधिकारी, सरपंच सेवा संघाचे सावंतवाडी माजी तालुकाअध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी लगावला.

याबाबत सावंतवाडी प्रभारी गटविकास अधिकारी यांना विचारले असता आपण १८ मे ला हजर होणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा प्रशासन आवारातील गाड्यांच्या हवा सोडवण्यापेक्षा प्रशासनातील ढिसाळ कारभारावर लक्ष घालावा. कारण, सावंतवाडी पंचायत समितीमध्ये रामभरोसे कारभार चालू आहे. दोन विस्तार अधिकारी पद असताना इकडचा एक विस्तार अधिकारी सुजित येरवळकर हा २३ मे २०२२ रोजी उसनवारीने तीन वर्षाकरिता पंचायत समिती कोरेगाव जिल्हा सातारा येथे १४ जून २०२३ ला सावंतवाडी येथून बदली झालेले आहेत. असे असताना त्यांची प्रशासकीय हजेरी मात्र सावंतवाडीतून लागते.

हा अजब कारभार सावंतवाडी पंचायत समितीचा तालुक्यामध्ये ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत. पैसे देऊन आयुक्त बदल्या केलेल्या आहेत. त्यामुळे अशा या कारभारावर लक्ष ठेवण्याऐवजी मुख्य कार्यकारी अधिकारी हे हवा सोडण्यात मग्न आहेत. त्यांच्या या अशा वागण्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे अगोदर आपला प्रशासनाचा कारभार व्यवस्थित चालवा आणि नंतर इतरत्र बघा, असा टोला गुरुदास गवंडे यांनी लगावला.

दरम्यान, प्रशासनामध्ये अनेक पद रिक्त आहेत. लोकांवर दबाव टाकून प्रधानमंत्री घरकुल योजनेची घरे पूर्ण करण्यात आली‌. परंतु, अजून पर्यंत लाभार्थ्यांना त्यांचे पैसे मिळत नाहीत. शासनाकडे निधी नाही तर मग लाभार्थ्यांवर का दबाव टाकता? त्यामुळे अगोदर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी आपल्या प्रशासन कारभार सुधारावा, असाही सल्ला गवंडे यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT