सावंतवाडीच्या मोती तलावात बुडून तरुणासह शाळकरी मुलीचा मृत्यू  
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : सावंतवाडीच्या मोती तलावात बुडून तरुणासह शाळकरी मुलीचा मृत्यू

मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणाने गमावला जीव

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : मोती तलावात बुडून एका शाळकरी मुलीसह तिला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. निशा भिकाजी गोसावी (वय १६, रा. कारिवडे, ता. सावंतवाडी) आणि रोहन विजय गोसावी (२५, रा. सरदारवाडी-नाधवडे, ता. वैभववाडी, सध्या रा. सांताक्रुज, मुंबई) अशी मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कारिवडे येथील शाळेत शिकणारी निशा शाळा सुटल्यानंतर मैत्रीण खुशी गणपत गोसावी (१७, रा. कारिवडे) आणि खुशीचा मावसभाऊ रोहन गोसावी यांच्यासोबत सावंतवाडी येथे आली होती. रोहन हा ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगून आजच सकाळी मुंबईहून सावंतवाडीत आला होता. दुपारी जुन्या गार्डनजवळील तलावाच्या कठड्यावर बसलेली असताना निशाने अचानक मोती तलावाच्या पात्रात उडी मारली.

निशा पाण्यात पडल्याचे पाहताच तिला वाचवण्यासाठी रोहनने तत्काळ तलावात उडी घेतली. तर दुसरीकडे मैत्रीण खुशी या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ काढत होती. मात्र, तो पाण्यात गटांगळ्या घेत असल्याचे दिसताच हा प्रकार तेथील स्थानिकांच्या लक्षात आला अन् त्यांनी तलावाकडे धाव घेऊन रोहनला तातडीने पाण्याबाहेर काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT