Pramod Jathar’s Political Comeback Rewarded for Loyalty
- गणेश जेठे
'वरिष्ठांकडून अन्याय आणि सहकाऱ्यांकडून गद्दारी ही राजकारणातली अपरिहार्यता आहे. या अपरिहार्य दुःस्थितीला झुगारून अनेकजण पक्षनिष्ठेचा दोरखंड स्वतःभोवती आजन्म गुंडाळून घेतात. प्रमोद अठार हे असेच एक राजकीय व्यक्तिमत्व. विचारधारा, बुद्धिमता आणि सततची कार्यममाता या त्रिवेणी संगमाच्या ताकदीवर त्यांना पक्षनिष्ठेचे गौड फळ मिळाले आहे.
मोदी लाटेच्या ऐन बहसत ते सताकारणापासून दूर होते. तरीही पक्षबांधणीच्या काट्याकुट्यातून न थकता ते चालत होते. आता पक्षाने त्यांना विधानपरिषदेवी आमदारकी बहाल केली आहे. आमदार प्रमोद जठार यांचे गुरुवारी आणि शुक्रवारी सिंधुदुर्गात माजपच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले आहे. जठार आणि कार्यकत्यांच्या चेहऱ्यावर या प्रवासात उत्साहाची लहर दिसते आहे.
2009 सालीच भाजपला जठार यांच्या रुपाने मास लीडर मिळाला होता. 2014 सालच्या पराभवानंतरही ते तसे थांबले नव्हते. काम सुरूच होते. राज्य पातळीवरील सर्वच भाजप नेत्यांशी त्यांचा संपर्क सुरुच होता. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील संघटनबांधणीची जबाबदारी त्यांच्याचर सोपविण्यात आली होती. लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळेल अशी वां होती, परंतु तसे घळले नाही. मध्ये कधीतरी ते सांत होते. कुणीतरी त्यांना बोलतं केलं तेव्हा ते म्हणाले होते, 'टायगर अभी जिंदा है आता "टायगर इज बैंक' म्हणत कार्यकर्ते जागोजागी उत्साहाने त्यांचे स्वागत करत आहेत आणि जठार आमदार झाल्यामुळे 'मी आमदार झालोय अशी भावना व्यक्त होत आहे.
पक्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पक्ष कार्यकत्र्याच्या प्रेमाची शाल अधाबदारीने पांघरूण घेण्यासाठी आमदार जठार यांचा दोन दिवसात पक्ष कार्यालयांमध्ये मेटीगाठीचा सोहळा झाला. भाजपचे सगळेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते या सोहळ्यामध्ये सहभागी दिसले. 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल' म्हणत जवार यांनी आपल्या पक्षाची महती कार्यकर्त्यांना सांगितली. पक्षनिष्ठेचे मूल्य सांगितले.
जो-तो उठतो, भाजपमध्ये प्रवेशतो. गर्दी वाढलीय आता जिथे गर्दी तिथे "गट तयार होण्याची भीती आहेच. ही शक्यता ओळखून जठार यांनी आपल्या या दौऱ्यात 'भाजप हा एकच गर्ट' असे पुन्हा पुन्हा तणकावून सांगितले. जो भाजपमध्ये प्रवेशतो तो साडेतीन हजार वर्षाच्या भारतीय संस्कृतीशी जोडला जातो, असा दावा त्यांनी कार्यकत्यांशी संवाद त्यांनी स्वीकारली आहे. साधताना केला आहे. 'इथे नया-जुना असे काही नाही, जसा येतो तसा घेतो आणि हवा तसा घडवतों, असेही आवर्जुन ते म्हणाले आहेत. पालघर ते सिंधुदुर्ग या कोकण पट्टयात आफग समन्वयकाची भूमिका बजावणार असा इरादाही त्यांनी सांगितलाच. अर्थात याबरोबरच विकासप्रक्रिया पुढे नेण्याची जवाबदारीही मुंबई ते आपला गाव असा परतीचा प्रवास
करत यापूर्वी अनेक चाकरमान्यांनी आपल्या भूमीत राजकारणात आणि समाजसेवा करण्यासाठी गावाकडची वाट मळून ठेवली होती. अनेकजण या अन्ममातीत रमले, स्थिरावले, झगडले, यशस्वी झाले, मात्र त्यातले काहीजण पुन्हा मुंबईकडे परतले. जठारसुद्धा याच मळलेल्या वाटेने सिंधुभूमीत आले. 'मला या मातीत गाडून ध्यायचे आहे आणि अंकुर म्हणून पुन्हा उगवायचे आहे. या भूमीची सेवा करायची आहे, अशी घोषणा त्यांनी केली होती. खरेच त्यांनी कष्ट घेतले. एक सर्वसामान्य माणसाशी संवाद साधणात, आपलासा वाटणारा नेता म्हणून निवडूनही आले.
पराभवानंतरही टिकून राहिले आणि आता चक्क विधानपरिषदेचे आमदार बनाले, समन्ययकाची जबाबदारी खांद्यावर घेत भाजपमधील सर्वच वरिष्ठ नेत्यांची भेट त्यांनी आमदार झाल्यानंतर घेतली. शुभेच्छा स्वीकारूया. हे खरे आहे की, आमदारकी दिली गेली तेव्हा पक्षश्रेष्ठींनी जठार यांच्यावर काही जबाबदाऱ्या टाकल्या असतीलच. त्या त्यांना पार पाडाव्या लागतील. त्याशिवाय त्यांच्या समोर अपेक्षांचा डोंगरही उभा आहे. 'देना ना घेना, कंदीलान जाना' हे हवं कशाला? असा नेहमी प्रश्न उपस्थित करणाऱ्या जठार यांच्याकडे राजकारणातली एखादी गुप्त स्ट्रेटेजी असण्याची शक्यता तशी कमीच आहे. जे काही असेल ते उच्च उघड हीच त्यांची स्ट्रॅटेजी ते नेहमी म्हणतात, माझ्या व्यक्तिमाचाला कुठला कानाकोपरा नाही, मी कुष्णाशीही अॅडजेस्ट होऊन जातो. आता त्यांना पक्षात मोठला संख्येने असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नेत्यांना अॅडजेस्ट करावे लागेल.
रोजगार निर्मिती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय, त्यासाठी ते सतत उपक्रमशील आहेत. कोकणातल्या तरुणांच्या रोजगारासाठीच्या हाकेला ओ देत त्यांचा आवाज विधिमंडळाच्या सभागृहात पोहोचण्याची संधी त्यांना मिळाली आहे. 'जेका उणे इत तेका दात नाय आणि दात हत तेका चणे नाय असे वास्तव सांगणाऱ्या जठार यांच्याकडे आता दोन्ही गोष्टी आहेत. परवा-परवाच त्यांच्या वाढदिवसाच्या सौहळ्यात शेकडो लोकांनी उत्साहाने गर्दी केली होती. शुभेच्छांचा इसलेला वर्षाव फळाला आला. आता पुढल्या वाढदिवसाच्या सोहळ्यात ही सत्तेवी फळे उपस्थिताना चाखायला जिळतील हिच अपेक्षा.