कणकवली : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी जिल्ह्यातील सात पोलीस अधिकार्यांच्या जिल्ह्यांंतर्गत बदलीचे आदेश काढले आहेत. यामध्ये कणकवली पोलिस निरीक्षकपदी प अतुल जाधव यांची तर कणकवलीत कार्यरत असलेले मारूती जगताप यांची मालवण पोलीस निरीक्षक म्हणुन नियुक्ती करण्यात आलेली आहे.
मालवणचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विजयदुर्गचे पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांची वैभववाडी पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बांदा पोलिस निरीक्षक विकास बडवे यांची जिल्हा विशेष शाखा, कुडाळचे एपीआय गजेंद्र पालवे यांची बांदा पोलीस ठाणे प्रभारी पदी, सावंतवाडीचे एपीआय संजय कातीवले यांची विजयदुर्ग पोलीस ठाणे प्रभारीपदी आणि कणकवलीचे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांची स्थानिक गुन्हे शाखा येथे बदली झाली आहे.