पैसे Pudhari
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : फोंड्यातील महिलेची २२ लाखांची फसवणूक

दुप्पट परताव्याचे दाखवले आमिष; कोकणातील दोघांविरोधात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

बांदा : आर्थिक योजनेत गुंतवणूक केल्यास रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत फोंडा येथील एका महिलेची तब्बल २२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी फोंडा-गोवा पोलिस ठाण्यात कोकण, महाराष्ट्र येथील पाटील आणि दुर्गामाता या दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्टपूर्वी पाटील आणि दुर्गामाता या दोघांनी तक्रारदार रूपाली नाईक यांच्याशी संपर्क साधला. आर्थिक योजनेत पैसे गुंतवल्यास गुंतवणुकीची रक्कम दुप्पट होईल, असे सांगून त्यांनी नाईक यांना मोठी रक्कम गुंतवण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून नाईक यांनी एकूण २२ लाख रुपये गुंतवणुकीसाठी आरोपींना पाठवले.

मात्र, रक्कम मिळाल्यानंतर आरोपींनी सांगितल्याप्रमाणे गुंतवणूक केली नाही. तसेच, आश्वासन दिलेला परतावा अथवा कोणताही लाभ दिला नाही. काही काळ प्रतीक्षा केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे नाईक यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी फोंडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

दरम्यान, तक्रारीत पाटील आणि दुर्गामाता अशी नावे नमूद असून, त्यांचे पूर्ण नाव, पत्ता व इतर सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे आरोपींचा शोध घेण्यास पोलिसांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. याप्रकरणी फोंडा पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक देविशा नाईक अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT